अकोला जिल्हा

नामांकित दुकानाच्या शिळ्या बुंदीमुळे नागरिकांना मळमळ; मिठाई नमकीन दुканаचा प्रताप

मातृभूमि वृत्तसेवा

। मूर्तिजापूर दि. १३।

मूर्तिजापूर शहरातील पटवारी कॉलनी बायपास रोडवरील एका मंदिरात पूजेच्या आरतीनंतर प्रसाद वाटप करताना, प्रसाद म्हणून आणलेल्या बूंदीतून तीव्र दुर्गंधी आल्याने आणि ती खालेल्या काही नागरिकांना मळमळू लागल्याने एकच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संप्तप नागरिकांनी थेट दुकान गाठत दुकानदाराची कानउघाडणी केली.

काय घडली नेमकी घटना? आज गुरुवार असल्याने शहरातील नामांकित असलेल्या ‘…’ या दुकानातून काही नागरिकांनी प्रसादाकरिता बुंदी खरेदी केली होती. ही बूंदी रात्री मंदिरात नेऊन पूजा व आरती झाल्यानंतर उपस्थितांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात आली. मात्र, बुंदी हातातळताना आणि खाताना उपस्थित लोकांना त्यातून तीव्र दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला. काहींनी ती खाल्ल्यानंतर त्यांना तात्काळ मळमळ व पोटात अस्वस्थता जाणवू लागली. लोकांचा वाढता संताप आणि आरोग्याशी खेळ होत असल्याचा रोष पाहून दुकानदाराची चांगलीच धांदल उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, दुकानदाराने तात्काळ संबंधित लोकांची माफी मागितली आणि प्रकरणाची सावरसावर करण्याचा प्रयत्न केला. अगोदर स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी अधिक वाद न घालता

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *