महाराष्ट्र

राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती

| मुंबई, दि. १३।

कॉंग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यावर, संजय राऊत यांनी मोदी-शाहांच्या राज्यात दुसरं काय होणार, असा सवाल केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त मुंबईतलं टिळक भवन येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात असंून या कार्यक्रमात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शवली आहे. त्यावेळी, राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, दोघांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, मोदी शाहांच्या राज्यात दुसरं काय होणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

मोदी-शाहांच्या राज्यात दुसरं काय होणार, पण ज्यांनी ज्यांनी फोन टॅपिंगचे उपक्रम केले, मग ते नेल्सनहूद असतील किंवा निक्सन सगळे राजकारणातून हद्दपार झाले, पराभूत झाले. मोदींच्या राजकीय राजकारणाला घरघर लागली आहे, सत्ता जाण्याच्या मार्गावर नाही, यांची सत्ता गेली आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी फोन टॅपिंगवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील राहुल गांधींच्या फोन टॅपिंगसंदर्भातील प्रश्नावर मोदी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला. फोन टॅपिंग हा आरोप नाही ती वस्तुस्थिती आहे. पेगासेस हे काही लोकांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले गेले होते. भाजपाच्या दिवंगत लोकांमध्ये देखील ते इन्स्टॉल केले गेले होते. तेव्हा ते दाबले गेले होते, एपस्टीन फाइलही दाबली गेली. मात्र, भाजप खोट्याची पाठा्र्रखण करत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

देशातील महागाई संदर्भात बोलताना, हे दुर्दैवी आहे, सत्ताधारीच याला जबाबदार आहेत, असे सपकाळ यांनी म्हटले. मोबाईलचा रिचार्ज देखील वाढला आहे, बाहेरून सगळं नियंत्रित केलं जात असून त्याचा हा परिणाम आहे. आगामी काळात हा भडका अधिक वाढेल, इंधनावर असलेल्या कराचा विचार सरकार करत नाहीत. भाजीपाला, गॅस, मोबाईल रिचार्ज वाढले जाणार आहेत. दुर्देव्ह हा भडका अजून वाढेल. म ह ा ग ा ई ‘ आटोक्यात आणण्यावर नियंत्रण नाही. मुळात मागणी पुरवठ्याचा खेळ सरकार खेळत आहे, असा गंभीर आरोप देखील सपकाळ यांनी केला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *