महाराष्ट्र

दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक

। नवी दिल्ली, दि. १३।

राज्याच्या राजकारणात दिवाळीनंतर मोठा भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. कारण, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आता राष्ट्रवादीचे नेतेही या चर्चेवर सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसून येतात. मात्र, माझा भाऊ गेला, आमच्याकडून विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यानंतर, आज राजधानी दिल्लीत दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचाली गतिमान असल्याचे दिसून येत आहे. कारण, आधी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या हयातीतच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती, जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाल्यानंतर हा विषय चर्चेत होता, असे भुजबळ यांनी म्हटले. तर, दुसरीकडे राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी आणि चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची दिल्लीत बैठक झाली, संसदेच्या परिसरात दोन्ही नेत्यांची ही भेट झाली असून ३५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *