२३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक
। गुवाहाटी, दि. १३।
ट्रक आणि प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक झाली आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा येथे आज शुक्रवारी भीषण अपघात झाला. पर्यटकांना घेऊन जाणारा ट्रॅव्हलरची ट्रकशी समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हलरचा अक्षरशः चुराडा झालेला पाहायला मिळाला. या घटनेत २० हुन अधिक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक ट्रॅव्हलरमध्ये अडकले होते. पोलीस आणि स्थानिकांनी मिळून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुवातीला पोलिसांना ७ जणांची मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यानंतर आणखी ५ जणांनी अखेरचा श्वास घेतला. आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झालेला आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.




