अकोला जिल्हा

रमजानपूर्वीच सोनोरी गावात पाणीटंचाईचे सावट

ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; पाणीप्रश्न गंभीर, वेळेची उपाययोजना करण्याची मागणी

मातृभूमि वृत्तसेवा

। मूर्तिजापूर, दि. ०७।

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने ग्रामीण भागात भूजलपातळी झपाट्याने खालावत असून, उन्हाळ्यापूर्वीच अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याच्या चिन्हे दिसू लागली आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरीम येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, ग्रामस्थांना आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रमजान महिन्याच्या प्रारंभापूर्वीच गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. गावातील विहिरी आणि हातपंपांमधील पाणीसाठा कमी होत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. अद्याप उन्हाळ्याला सुरुवातही झालेली नसताना पाण्याची अशी परिस्थिती असेल, तर आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक भीषण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, गावातील बहुतांश नागरिक हे मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेणे प्रत्येकाला शक्य नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *