शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक
। मुंबई, दि. ७।
शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची जुनी परंपरा असून दिवाळीच्या दिवशी होणारेविशेष सत्र गुंतवणूकुकीसाठी शुभ मानले जाते. अनेक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सुरू करायला नवीन शेअर्स खरेदीसाठी या दिवसाचा प्रसंग साधतात. शेअर मार्केटमध्ये सामान्यतः शनिवार आणि रविवारी व्यापार बंद असतात पण यंदा उद्या ८ नोव्हेंबर रोजी बाजार काही तासांसाठी उघडणार आहे.
मुहूर्त ट्रेडिंगमुळे शेअर बाजार उद्या रविवारी बंद राहणार नाही, तर एनएसई आणि बीएसई या दोन्ही निर्देशांकात ८ नोव्हेंबर २०२६ रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्रीची संधी मिळेल आणि यासाठी एक्सचेंजने वेळही निश्चित केली असून मुहूर्त ट्रेडिंग कधी होणार आणि त्याचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे? माहितीनुसार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २:२० वाजता मुख्य मुहूर्त ट्रेडिंग सत्र सुरू होईल आणि दुपारी ३:३० पर्यंत चालेल. त्याआधी दुपारी २:०५ ते २:२० या वेळेत प्रों-ओपन सत्र आयोजित केले जाईल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मुख्य ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी ऑर्डरची संधी मिळेल. ब्लॉक डील विंडो: दुपारी १:५० ते २:०५, क्लोजिंग सेशन (नॉन-उअड): दुपारी ३:३० ते ३:५०, क्लोजिंग सेशन (सीएस): दुपारी ३:३५ ते ३:५०, पोस्ट-क्लोजिंग सेशन: दुपारी ३:५० ते ४:०० राहील.
विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्रातिरिक्त एक्सचेंजेसच्या कॅलेंडरनुसार, भारतीय इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हज बाजार नोव्हेंबरमध्ये खालील तारखांना बंद राहतील : नोव्हेंबर ८ : रविवार (मुहूर्त ट्रेडिंग सत्र), नोव्हेंबर १० : दिवाळी-बलिप्रतिपदा, नोव्हेंबर १४ : शनिवार, नोव्हेंबर १५ : रविवार, नोव्हेंबर २१ : शनिवार, नोव्हेंबर २२ : रविवार, नोव्हेंबर २४ : प्रकाश गुरुपर्व श्री गुरु नानक देव, नोव्हेंबर २८ : शनिवार, नोव्हेंबर २९: रविवारला बंद राहील.
भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची जुनी परंपरा आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार दिवाळीच्या दिवशीच्या एका तासाच्या विशेष सत्राला शेअर्स खरेदी करण्यासाठी शुभ मानतात.
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी शेअर बाजारकडून जाहीर केली जाते आणि सहसा दिवाळीच्या संध्याकाळशी जुळते.




