बाजोरिया हाऊस लॉनवर जिल्ह्यातील नगरसेवकांच्या हस्ते झाले दिवाळी अंकाचे प्रकाशन
अकोला, दि. ७।
स्वातंत्र्यपूर्व काळापासून या दैनिकाने विदर्भ जनता दिशा दाखविण्याचे काम करण्यासोबतच ज्ञान, माहिती आणि मनोरंजन देण्याचे कार्य केले आहे, याच परंपरेला साजेसा दिवाळी अंक वाचकांना दिला असून त्यातील सकस मजकूर तरुणांना दिशादर्शक ठरेल असा विश्वास ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ.दीपक केळकर यांनी आज येथे व्यक्त केला.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येवर आज बाजोरिया हाऊस वरील लॉनवर दे.मातृभूमीचे आधारस्तंभ माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विशेष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या हस्ते मातृभूमीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मातृभूमी हे विदर्भातील सर्वात जुने आणि जाणते दैनिक असून स्वातंत्र्यसेनानी ब्रजलालजी बियाणी यांनी लावलेले हे रोपेटे आता आगामी तीन वर्षांत शताब्दी गाठणार आहे, एकेकाळी भारताच्या संसदेत ज्यांच्या पहिल्या अंकांची छायांकित प्रत साळण्यात आली असे भाष्य प्रांजाल झालेले हा एकमेव दैनिक असल्याचे माहिती यावेळी गोपीकिशन बाजोरिया यांनी देऊन आज ९७ वर्ष सुद्धा या दैनिकाने आपला समाज प्रबोधनाचा वारसा सोडलेला नाही, सामान्य व्यक्ती, शेतकरी, उद्योजक आणि समाजातील सर्व वर्गाला उपयोगी मजकूर देण्याचे काम अव्याहत सुरू असल्याचे माहिती त्यांनी दिली.
यावेळी मातृभूमीच्या १५२ पानाच्या दिवाळी अंकात झेन झो: व्यवस्था परिवर्तन की तात्पुरता संताप ? आणि युवाबाजी : बळी शियांचा की कुटुंबाचा ? असे दोन ज्ञानवर्धक परिसंवाद घेतले असून या दोन्ही परिसंवादात नामवंत लेखक आणि विचारवंतांनी सहभागो होऊन लेखन केले आहे त्यामुळे हे दोन्ही परिसंवाद वाचनीय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. प्रारंभी मातृभूमीचे संपादक विप्लव बाजोरिया यांनी मान्यवरांचे स्वागत केल्यावर ज्येष्ठ मार्गदर्शक गोपीकिशन बाजोरिया यांनी जिल्ह्यातील सर्व नगरसेवकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मातृभूमीचे समूह संपादक पुरुषोत्तम आलारे पाटील ,डॉ.दीपक केळकर, आशिष पवित्रकार,आझाद खान,रवी धानुका, प्रशांत घटकर,रामभाऊ फाटक, गजानन कांबळे,अतुल येडणे, तेल्हारा येथील अमित अग्रवाल,राजेश खरोडे,कैलास टोकणे,मुकेश आमरे,पंकज कचर पातुरचे नगराध्यक्ष इंदू पहलवान,फेय्याज अन्सारी,मुजाहिद भाई, बाळापूर पालिका अध्यक्ष ईनोदीन खतीब, उपाध्यक्ष सुरेन्द्र घोपटे सचिन देशमुख,सलमान खान,संचालल पेवले,प्रशांत कांबें,राहुल पाटील,कैलास महाजन,निलेश वानखडे,गंगू शर्मा, लक्झन अरोरा,रवी मार्केड,राम घाणीवाले,तशावर खान,रफिक कुरेशी,सद्दाम पटेल,संदीप मरनाईक इत्यादी उपस्थित होते.




