अकोला जिल्हा

दुष्काळाच्या झळा कायम ; दिवाळीच्या बाजारात गर्दी

। बारामती, दि. ०७।

एकीकडे दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे आनंदाचा दीपोत्सव असलेल्या दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे.

दिवाळीनिमित्त बार्शीटाकळी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग दिसून येत असून बार्शीटाकळी, पिंजर, महान, दाबा, कान्हेरी सरप यासह प्रमुख गावांतील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत. मात्र, बाजारपेठांमध्ये गर्दी असली तरी ग्राहकांच्या चेहऱ्यावर अपेक्षित उत्साहाऐवजी अर्धवट समाधानच दिसून येत आहे. दिवाळी म्हटली की नवीन कपड़े, मिठाई, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या आणि घरगुती उपयोगाच्या वस्तूंची खरेदी आलीच. त्यामुळे नागरिकांची बाजारपेठेत धावपळ सुरू आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळणे, आर्थिक अडचणी आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक खरेदी करताना खर्चाचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे सण साजरा करण्याची इच्छा असली तरी खिशाला बसणारी झळ आनंदावर मर्यादा आणत असल्याचे चित्र आहे.

बाजारपेठा गजबजल्या, मात्र व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता!

विशेष म्हणजे ग्राहकांप्रमाणे व्यापारी वर्गही यंदाच्या व्यवसायाबाबत पूर्णपणे समाधानी नसल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीच्या सणात मोठ्या उलाढालीची अपेक्षा असलेल्या व्यापाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. बाजारपेठेत वर्दळ वाढली असली तरी प्रत्यक्ष खरेदी आणि व्यवसायावर आर्थिक परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. एकंदरीत, दिवाळीच्या रोषणाईने बाजारपेठा उजळल्या असल्या तरी दुष्काळाच्या सावटाने ग्रामीण अर्थव्यवस्थेतील चिंता अद्याप दूर झालेली नाही. दिव्यांचा प्रकाश घराघराérant पोचत असताना शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे पूर्ण हास्य उमटण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. दिवाळीचा उत्साह बाजारपेठेत दिसतोय; मात्र दुष्काळाची चिंता अजूनही मनामनांत कायम आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *