अकोला जिल्हा

भाऊबीजेला बहिणीने भावाला टिळा लावून केले औक्षण!

सुख-दुःखात साथ देणाऱ्या बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव!

। हातरुण, दि. १३।

घराघरात स्वच्छता, आकर्षक रोषणाई, अंगाणातील रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्यांचा लखलखाट, फराळाचा सुगंध आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा आनंदमय वातावरणात दिवाळी साजरी केली जाते. अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा हा दीपोत्सव भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. दिवाळी केवळ दिव्यांची रोषणाई नसून माणसांना एकत्र आणणारा, नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणारा आणि आनंदाची देवाणघेवाण घडवणारा उत्सव आहे. याच दिवाळीच्या आनंदात बहीण-भावाच्या प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेची भर पडते.

सुख-दुःखाच्या प्रत्येक पळणावर एकमेकांना साथ भाऊ-बहीण देतात. बालपणी एकमेकांसोबत घालवलेले क्षण, छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारी भांडणे, एकमेकांची केलेली मस्करी, संकटाच्या वेळी दिलेली साथ आणि आनंदाच्या प्रसंगी एकत्र केलेला जल्लोष या सगळ्या आठवणी या नात्याला अधिक समृद्ध करतात. कधी भाऊ बहिणीचा आधार बनतो, तर कधी बहीण भावाला योग्य वेळोवेळी धीर देते. एकमेकांविषयीची काळजी आणि प्रेम कायम असते. या नात्यात अधिकार असतो, राग असतो, लाड असतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निःस्वार्थ माया असते. याच नात्यातील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे भाऊबीजेचा सण.

भाऊबीजेचा दिवस जवळ येताच घरातन्त सगळ्यांच्या तयारीला सुरुवात होते. भावाच्या औक्षणासाठी ताट सजविणे, कुंकू, अक्षता, दिवा आणि मिठाईची व्यवस्था करणे, आवडीचे गिफ्ट देणे, याची लगबग दिसून येते. या तयारीतून सणाविषयीचा आनंद आणि भावंडांच्या नात्यातील आपुलकी व्यक्त होत असते. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला पाटावर बसवून त्याच्या फळाळावर कुंकूचा टिळा लावते. औक्षण करून ओवाळताना भावाच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते. त्यानंतर भावाला मिठाई देते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो. भाऊबीजेला बहिणीने पारंपरिक पद्धतीने भावाचे औक्षण केले.

भावाचे सुख हेच बहिणीसाठी समाधान – स्वाती गव्हाळकर

भाऊ डॉ. अमर सुलतान यांना औक्षण केल्यानंतर स्वातीबाई गव्हाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणल्या, बहीण-भावाचे नाते हे आयुष्यभर सोबत राहणारे नाते आहे. बालपणीच्या आठवणी, एकमेकांसोबतचे क्षण आणि सुख-दुःखात मिलणारी साथ या गोष्टी आयुष्यभर मनात राहतात. भाऊबीजेच्या दिवशी भावाला टिळा लावून ओवाळताना मनाला विशेष आनंद मिळतो. भावाने नेहमी आनंदी आणि निरोगी राहावे, त्याच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, हीच माझी प्रार्थना आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *