। अकोला, दि. १३
अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याच्या अपव्ययावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये झोन निहाय पथके कार्यान्वित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दक्षिण झोन अंतर्गत मंगरूळपीर रोड, खडककी येथील महाकाल वॉटर सर्व्हिसिंग आणि श्री समर्थ वॉटर सर्व्हिसिंग सेंटर हे प्रशासनाद्द्वारा वॉटर सर्व्हिसिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश दिल्यावरही त्यांचे वॉटर सर्व्हिसिंग सेंटर सुरु आढळल्यामुळे दोन्ही दुकानावर मनपा दक्षिण झोन कार्यालय मार्फत सील लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर कारवाई मनपा सहा. आयुक्त देविदास निष्काळजे यांच्या मार्गदर्शनात आणि उपस्थितीत झाली असून या कारवाईत स्वच्छता निरीक्षक रुपेश मिश्रा, कनिष्ठ अभियंता शुभम अफुने, कर वसुली लिपिक गोपाल लोखंडे, संतोष खाडे, देवेंद्र बोबडे यांचा समावेश होता.



