अकोला सिटी

शिक्षकांवर वाढला अशैक्षणिक कामाचा भार

जनगणना आणि एसआयआरच्या कामामुळे शिक्षकांची कसरत

। अकोला, दि. १३।

शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना त्यांच्याकडे सातत्याने विविध अशैक्षणिक कामे सोपविली जात आहेत. त्यामुळे शिक्षकांचा मोठा वेळ अध्यापनाऐवजी प्रशासकीय कामांमध्ये खर्च होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात शिक्षकांना एसआयआरच्या कामात गुंतविण्यात आले होते. या कामामुळे नियमित अध्यापनात अडथळे निर्माण झाले. आता दुसऱ्या सत्रात शिक्षकांवर जनगणनेची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याने त्यांची पुन्हा एकदा धावपळ होणार आहे. एसआयआरच्या कामासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने शिक्षकांप्ररील कामाचा ताण आणखी वाढला आहे. जनगणनेच्या तयारीसाठी २१ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन ते चार दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यानंतर २१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रत्यक्ष जनगणनेचे काम पार पडणार आहे. २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर नागरिकांची गणना केली जाणार असून, १ ते ५ मार्चदरम्यान पुनर्गणना होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांचा मोठा वेळ खर्च होणार आहे. याशिवाय वर्षभरात विविध शासकीय प्रशिक्षण, कार्यशाळा, बैठका, लेखापरीक्षण, जंतनाशक गोळ्यांचे वाटप, तंबाखूमुक शाळा अभियान आणि ऑनलाइन माहिती भरण्याची कामेही शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे शाळेतील नियमित अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार शिक्षकसंघτ केली जात आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून त्यांचा अधिकाधिक वेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *