भारत समिटमध्ये इटा्लियन नेत्याच्या ‘व्होट चोर, गद्दी छोड’ घोषणानेला राहुल गांधींची टाळ्या वाजवून दाद
हैदराबाद, दि. १५
हैदराबाद येथे पार पडलेल्या ‘भारत समिट २०२६’ परिषदेत एका परदेशी नेत्याने केलेल्या विधानावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. इटलीचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी काँग्रेसची ‘व्होट चोर, गद्दी छोड’ ही घोषणा दिल्यानंतर, लोकसभाील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टाळ्या वाजवून दाद दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेवरून भाजप आणि भारत राष्ट्र समितीने काँग्रेसवर भारताच्या अंतर्गत राजकारणात परदेशी हस्तक्षेप घडवून आणल्याचा आरोप केला आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या विधानाचे समर्थन करत भाजपवर पलटवार केला आहे. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातल वृत्त दिलं आहे.
या प्रकरणावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी ‘एक्स’ सोशल माध्यमावरून राहुल गांधींवर निशाणा साधला. थेट नाव न घेता त्यांनी राहुल गांधींच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखादा परदेशी नागरिक भारताचा अपमान करत असताना कोणी हसतना तुम्ही कधी पाहिले आहे का? परदेशात जाऊन कोणता भारतीय देशाचा अपमान करतो, हे मी विचारत नाहीये, अशा शब्दांत रिजिजू यांनी उपरोधिक टीका केली. ‘पार्टी ऑफ युरोपियन सोशलिस्ट’चे सरचिटणीस जियाकोमो फिलिबेक यांनी भारत समिटमध्ये बोलताना मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात राहुल गांधींनी उभारलेल्या मोहिमेचे कौतुक केले. प्रत्येक लोकशाहीचा पाया असलेला ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वाचे राहुल गांधींनी रक्षण केले आहे. पारदर्शक मतदार याद्यांसाठी त्यांनी सुरू केलेली मोहीम आणि दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील रामलीला मैदानावर त्यांच्यासोबत जमलेला हजारो नागरिकांचा जनसमुदाय हेच दर्शवतो की लोकशाही सहज मिळत नाही, त्यासाठी उभे राहावे लागते, असे फिलिबेक म्हणाले.



