नवी दिल्ली , दि. ७ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्त व्हिडिओ संदेशाद्वारे देसातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आपण परंपरा कायम ठेवत या वेळची दिवाळीही देशाच्या वीर जवानांसोबतच साजरी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. असल्याचे स्पष्ट केले आहे. दिवाळी निमित्त दिलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले, दिवाळीच्या शुभप्रसंगी संपूर्ण देश दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. प्रकाशाचा हा उत्सव अंधकाराविरुद्धच्या आपल्या संकल्पाचे प्रतीक आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा. आपल्यासाठी हा उत्सव आणि आगामी काळ सुख, शांती आणि समृद्धीने भरलेला असो. मी देखील आपल्याप्रमाणेच मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतो.
आपल्याला माहीतच आहे की, दरवर्षी देशाच्या जवानांसोबत राहणे हा माझा नित्यक्रम आहे. यावर्षीही तो तसाच सुरू राहील. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा.” या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची शिष्टाचार भेट घेत त्यांना दीवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आयुर्वेद आणि आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांना नमन करत पंतप्रधानांनी देशवासीयांच्या निरोगी आणि सुखमय आयुष्यासाठी प्रार्थना केली.




