अकोला सिटी

82 हजार शेतकरी मदतीपासून वंचित!

लालफितीशाही फटका : ‘दिवाळी काळी होऊ देणार नाही’ या सरकारच्या आच्छानासाचा विसर

३ लाख ६ हजार शेतकरी पात्र, २ लाख २४ हजारांनाच मदत, उर्वरित प्रतीक्षेत

अकोला, दि. १५

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,’ अशी ग्वाही देणाऱ्या महायुती सरकारच्या आश्‍वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र कागदावरच असल्याचे चित्र आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा झाली; मात्र दिवाळी संपून सात दिवस उलटूनही तब्बल ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या घोषणेचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष मदतीतील दिरंगाई यातील तफावत पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रशासकीय लालफितीशाही आणि माहिती पडताळणीच्या सधन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुख्यमंत्री यांनी १४ ऑक्टोबर रोजी अग्रिम मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या घोषणेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष मदतवाटपाची गती पाहता सरकारची घोषणा आणि प्रशासनाची कार्यvahi यांच्यात मोठी दरी असल्याचे स्पष्ट होत आहे.

अकोला जिल्ह्यात अग्रिम मदतीसाठी पात्र ठरलेल्या ३ लाख ६ हजार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ २ लाख २४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित ८२ हजार शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी आर्थिक हातभार मिळेल, या आशेने बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. सणासुदीचा काळ संपला, मात्र मदतीची प्रतीक्षा संपण्याचे नाव घेत नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *