अकोला सिटी

दहा महिन्यांत ७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

खरीप हंगामातील चार महिन्यांत ६२ जणांनी संपवले जीवन

ऑक्टोबरमध्ये आणखी नऊ घटना

२६ वर्षांत जिल्ह्यात ३ हजार ४१२ शेतकरी आत्महत्यांची नोंद

अकोला, दि. १५

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्याचे गंभीर परिणाम शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असून, शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीतून या संकटाची तीव्रता समोर येत आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी कालावधीत जिल्ह्यात ६२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले, तर ऑक्टोबर महिन्यात आणखी नऊ आत्महत्यांची नोंद झाली. म्हणजेच जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत ७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.

उत्पादन खर्च आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न यांचा बिघडलेला ताळमेळ, वाढते कर्ज, नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाला मिळणार अपुरा मोबदला यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. त्यातच यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेने शेतीचे अर्थकारण कोलमडले. परिणामी, ग्रामीण भागातील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच विविध संकटांचा सामना करावा लागला. जून महिन्यात कपाशीच्या पसंतीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. त्यानंतर सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या तक्रारींनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली. जूनमध्ये अपेक्षित आणि वेळेवर पाऊस झाला नाही. जुलैमध्ये काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनची पिके सुकली. कपाशीसह इतर पिकांनाही त्याचा फटका बसला.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते, तर यंदा अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले. कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होण्याबरोबरच पिण्याचा पाणी आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. हंगामातील खर्च वसूल होण्याची शक्यता कमी.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *