विदर्भ

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!

। बुलढाणा दि. १३ ।

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुंबई कॉरिडॉरवरील चेनज क्रमांक ३३२ वर वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यात नागपूरकडून मुंबईकडे जाणारा एक भरधाव ट्रक वेगाने घुसला. मागून येणारी १२-१५ भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. या साखळी अपघातात तब्बल १२ ते १५ वाहने एकमेकांवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. प्रवासी वाहनातील २० ते २२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवर एक टँकर पलटी झाला होता. क्रेनच्या मदतीने हा पलटी झालेला टँकर बाजूला काढण्याचे काम सुरू होते. वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवली होती. त्यामुळे घटनास्थलळी सुमारे ४० ते ५० वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक थेट समोर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. सकाळच्या अपघातामुळे आधीच आधीच खोळंबलेल्या वाहतूकला या अपघाताचा फटका बसला. रस्ता रिकामा होईपर्यंत थांबलेल्या प्रवाशांना ट्रकने गाठले. वाहनांची रेष असताना चालकाला ट्रक का थांबवता आला नाही? हा महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पहिल्या धडकने वाहन पुढे ढकलली गेली आणि त्या मागे धडकेची मालिका सुरूच झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *