क्रीडा

पदार्पणाताच ५ विकेट्सचा पराक्रम

सिडनी – सँडपेपर गेटप्रकरणाच्या आरोप प्रत्यारोपांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट ढवळून निघालेलं असताना युवा वेगवान गोलंदाज माहिल बिअर्डमनच्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केलं. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि हेझलवूड या अनुभवी त्रिकुटाला विश्रांती देण्यात आल्याने माहिल बिअर्डमनला संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू माईक हसी यांनी माहिला ऑस्ट्रेलियाची कॅप दिली.

प्रचंड वेगाने गोलंदाजी करणाऱ्या माहिलने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला बाद करत कारकिर्दीतली पहिली विकेट पटकावली. ऑफस्टंप बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न ब्रूकच्या अंगलट आला. यष्टीरक्षक जोश इंग्लिसने सोपा झेल टिपला. ब्रूकपाठोपाठ माहिलने अनुभवी जो रूटला माघारी परतवलं. ब्रूकप्रमाणेच रूटनेही इंग्लिसकडे झेल दिला.

चांगला फॉर्म कायम राखत माहिलने जॉर्डन कॉक्स आणि सॅम करन यांना तंबूचा रास्ता दाखवला. लायल डॉसनला बाद करत माहिलने वनडे पदार्पणाताच पाच विकेट्स पटकावण्याची किमया केली. ही कामगिरी करणारा माहिल एकूण १८ वा तर ऑस्ट्रेलियाचा केवळ दुसरा गोलंदाज ठरला. १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टोनी डोडेमेड यांनी पर्थ येथे श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेण्याची किमया केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी वनडेत असा विक्रम करणारा माहिल दुसराच गोलंदाज आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *