क्रीडा

चौथ्या वनडेत भारताचा लाजीरवाणा पराभव

गौतम गंभीरने फलंदाजांना झापले

 । बे ओव्हल, दि. १३।

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या वनडेत भारताचा मोठा पराभव झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांच्यासारखे दिग्गज अपयशी ठरल्यानं भारताचा डाव ८९ धावांवर आटोपला. भारताला चौथ्या वनडेत २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संतापला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा चेंडू नसतो जो खेळता येऊ शकत नाही, अशा शब्दांत गंभीरनं फलंदाजांना फटकारलं आहे.

गंभीरनं न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्री याचं देखील कौतुक केलं. ३३४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतनं एकही रन झालेली नसताना तीन विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गमावल्या होत्या. विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खातं न उघडता बाद झाले. न्यूझीलंड विरोधीतील चौथ्या वनडेत भारताचा संघ ८९ धावांवर बाद झाला. वनडे क्रिकेटमधील भारताची ही सर्वात छोटी सहावी धाव संख्या ठरली. धावांच्या आधारावर भारताचा हा सर्वात मोठा दुसरा पराभव ठरला. मॅट हेन्रीटीनं चांगल्या लाइनवर गोलंदाजी केली. विराट कोहलीची विकेट ज्या बॉलवर गेली तो बॉल टप्पा पडून आत आला ज्यावर कोहली काही करू शकला नाही. गौतम गंभीरनं मचनंतर पत्रकार परिषद घेत फलंदाजांना झापलं. गंभीर म्हणाला की गोलंदाजांनी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली. मात्र, आपण त्याचा सामना करायला पाहिजे होता, असं गंभीर म्हणाला.

गौतम गंभीरनं म्हटलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एकही बॉल नसतो जो खेळता येत नाही. मॅट हेन्रीटीनं योग्य ठिकाणी गोलंदाजी केली, आम्हाला त्याचा सामना करायला जमला पाहिजे. जेव्हा तुम्ही ९० धावांवर बाद होता तेव्हा हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वर्ल्ड कप जवळ असताना ही स्थिती आहे. तिसऱ्या वनडेत देखील आम्ही ७ विकेट गमावल्या होत्या, हा चिंतेचा विषय असल्याचं गंभीरनं म्हटलं.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *