गिलगिट । पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात भीषण अपघात झाला. गिलगिटमधून हुंदूर गावाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली व्हॅन नोह ब्रिजजवळ यासीन नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाने नदीतून ११ मृतदेह आणि तीन जखमी प्रवाशांना बाहेर काढले आहे. पण व्हॅनमध्ये आणखी काही प्रवासी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीत बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे




